वर्जितांची संस्कृती
संस्कृती या शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. पण मला सगळ्यांत जास्त भावलेला अर्थ, म्हणजे ‘समाजात रूढ असलेला सामायिक मूल्यांचा संच.’ समाजात असलेल्या अनेक घटकांना एका धाग्यात विणण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्कृती पार पाडते. त्या अर्थाने, संस्कृती ही सामाजिक वस्त्रांची शिवण समजली जावी. एखाद्या समाजाची संस्कृती जितकी कालसुसंगत असते, तितकी त्या समाजाची वैचारिक प्रगतीसुद्धा वाढत जाते. आणि …